तुला पाहाते रे ही मालिका गेल्या कित्येक आठवड्यापासून दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या या मालिकेत विकिशाच्या लग्नाचे सर्व विधी तसेच हळद, मेहंदी, संगीत, साखरपुडा हे समारंभ अगदी धुमधडाक्यात आणि निर्विघ्नपणे पार पडले. बऱ्याच मराठी मालिकांमध्ये नायक आणि नायिका यांच्या लग्नाला प्राधान्य असते. सध्या छोट्या पडद्यावर गाजत असलेली झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘तुला पाहते रे’ मधील विकिशाचं म्हणजेच विक्रांत आणि इशा यांच्या शाही लग्नसोहळयाची सर्वत्र चर्चा होत आहे. लवकरच मालिकेमध्ये विक्रांतच्या पहिल्या पत्नीची दमदार एन्ट्री होणार आहे. या मालिकेत काय नवीन वळण येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.