साहित्य :
३-४ गाजर स्वच्छ धुवून साली काढून किसून घ्यावेत.
फोडणीचे साहित्यः
४ ते ५ हिरव्या मिरच्या आणि मूठभर भाजलेले शेंगदाणे मिक्सर ला अर्धवट बारीक करून घ्यावेत, दोन मोठे चमचे डाळीचं पीठ, चवीनुसार मीठ, वरून घालायला कोथिंबीर, लाल तिखट चवीनुसार.
कृती:
कुकरमधे एका छोट्या भांड्यात कीसलेले गाजर थोडं पाणी घालून शिजवून घ्या किंवा नुसती वाफवून घेतली तरी चालेल.
जास्तीचं पाणी काढून न टाकता त्यात डाळीचं पीठ घालून नीट मिक्स करून घ्यायचे.
तेल तापत ठेवून खमंग फोडणी करून भांड्यातील गाजरे आणि डाळीच्या पिठाचे मिश्रण घालून हलक्या हाताने परतून घेणे, मिरच्या आणि शेंगदाणे यांचे वाटण घालून लागेल तेवढंच पाणी, मीठ घालून एक मस्त उकळी काढावी.
तयार झाल्यावर त्यावर कोथिंबीर घालून गरमागरम गाजर आमटी चा आस्वाद घ्या.