Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या…भारतातला सर्वात श्रीमंत पक्ष कोणता ते ?

जाणून घ्या…भारतातला सर्वात श्रीमंत पक्ष कोणता ते ?

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात देशात सर्वत्र निवडणूकीची धामधूम सुरू आहे. अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. पक्षातील उमेदवारी दाखल केलेल्या
अर्जामुळे कोणत्या पक्षाकडे किती संपत्ती आहे, याबाबतची माहितीदेखील समोर आली आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाने एक रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे.

निवडणूक आयोगाच्या रिपोर्टनुसार, बँक खात्यांमधील रक्कमेच्याबाबतीत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने अन्य सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांना मागे टाकलंय. दिल्लीतील सरकारी बँकांच्या शाखेमधील आठ वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण ६७० कोटी रुपये डिपॉजिट आहेत.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी आहे. सपाकडे तब्बल ४७१ कोटी रुपयांचा बँक बॅलन्स आहे.

काँग्रेस या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेसकडे १९६ कोटींचा बँक बॅलेन्स आहे.

चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष तेलुगु देसम पार्टी चौथ्या क्रमांकावर आहे. टीडीपीकडे १०७ कोटी रुपये इतका बँक बॅलन्स आहे.

भाजपा मात्र या यादीत प्रादेशिक पक्षांच्याही मागे पडली आहे. भाजपा टीडीपीनंतर पाचव्या स्थानावर आहे. भाजपाकडे ८२ कोटींचा बँक बॅलेन्स आहे.

निवडणूक आयोगाच्या रिपोर्टमध्ये लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे. देशातील सर्वात मोठे पक्ष असलेले भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष संपत्तीच्या बाबतीत बसपा आणि सपाच्या जवळच्या रेषेतदेखील नाहीत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *