Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भाषण करण्याची संधी न दिल्याने भाजपचा ‘हा’ नेता तर स्टेजवर रडायलाच लागला!

भाषण करण्याची संधी न दिल्याने भाजपचा ‘हा’ नेता तर स्टेजवर रडायलाच लागला!

नवी दिल्ली – २०१९च्या लोकसभा निवडणूकीतील दुसऱ्या टप्प्यातील मतदान जसजसे जवळ येत आहे, तस तसे राजकीय पक्षांच्या प्रचाराची रंगत वाढत चालली आहे. प्रचारसभांमधून अनेक नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीका करताना पाहायला मिळत आहेत. अशातच काही ठिकाणी नेते स्वपक्षाविरोधात उघड नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहे.

रविवारी (१४ एप्रिल) भाजपाकडून हरियाणामधील औरंगाबाद गावात मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह भाजपाचे अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित होते. यादरम्यान मंचावर भाषण करण्याची संधी न मिळाल्याने होडल मतदारसंघातून भाजपाचे माजी आमदार राहिलेले रामरतन भावुक होत लहान मुलाप्रमाणे रडू लागले.

माजी आमदार राम रतन यांना रडताना पाहून मंचावरील इतर भाजपा नेत्यांनी त्यांची समजूत काढली आणि शांत केले. या घटनेचा एक व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *