Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आझम खान यांच्या अश्लिल टीकेला जया प्रदांच सडेतोड प्रत्युत्तर

आझम खान यांच्या अश्लिल टीकेला जया प्रदांच सडेतोड प्रत्युत्तर

उत्तर प्रदेश: समाजवादी पक्षाचे सरचिटणीस आझम खान यांनी रविवारी (१४ एप्रिल) जाहीर सभेत भाजपच्या लोकसभेच्‍या उमेदवार आणि अभिनेत्री जया प्रदा यांच्यावर अश्लिल टीका केली आहे. त्‍यांच्‍या याच टीकेला जया प्रदा यांनी सडेतोस उत्तर दिले आहे. “मी आझम खानला घाबरून रामपूरमधून पळणार नाही, तर त्याला हरवूनच मी काय आहे ते दाखवून देईन” असा विश्वास व्यक्त करत जया प्रदा यांनी आझम खान यांना प्रत्युत्तर दिले आहे.

आझम खान यांनी माझ्याबद्दल केलेले आक्षेपार्ह विधान माझ्यासाठी अजिबात नवीन नाही. २००९ मध्ये मी समाजवादी पार्टीची उमेदवार होते. तेव्हाही त्यांनी माझ्याबद्दल अशीच टिप्पणी केली होती. त्यावेळी तर कुणीच माझ्या पाठिशी उभं राहिलं नव्हतं. मी एक महिला आहे. ते जे काही म्हणाले ते मीही बोलू शकत नाही,’ असं जयाप्रदा म्हणाल्या.

‘मी त्यांचं काय चुकीचं केलं काय माहिती की ते माझ्याबद्दल असे वाईट विधान करत आहेत. मी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. जनतेलाही कळलं आहे. लोक त्यांना सोडणार नाहीत. त्यांना निवडणूक लढवू देणार नाहीत. जर ते निवडणूक जिंकले तर लोकशाहीचं काय होईल? समाजात महिलांना कोणतंच स्थान राहणार नाही. मी मरेन तेव्हाच खात्री पटेल का? जयाप्रदा कोण आहे हे तुमचा पराभव करून दाखवून देईन. तुमच्या घरात आया-बहिणी नाहीत काय?’ असा सवालही जयाप्रदा यांनी आझम खान यांना केला.

जयाप्रदा यांनी काही दिवसांपूर्वी भाजपत प्रवेश केला आहे. त्‍या रामपूर मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्‍या विरोधात लोकसभा लढवत आहेत. समाजवादी पक्षाचे सरचिटणीस आझम खान यांनी काल झालेल्या एका जाहीर सभेत जया प्रदा यांच्यावर अश्लिल टीका केली होती. याप्रकरणी आझम खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना नोटीस बजावली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *