“विजय मल्ल्या चोर है” च्या घोषणांनी दणाणून गेला लंडन मधील स्टेडियमचा परिसर
लंडन: भारतीय बँकांना हजारो कोटींचा चुना लावून पळून गेलेला मद्य सम्राट विजय मल्ल्या हा काल भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना पाहण्यासाठी लंडन च्या स्टेडियम जवळ पोहोचताच लोकांनी एकच कल्ला केला. ‘विजय मल्ल्या चोर है’ च्या घोषणा चक्क त्याच्या तोंडावर त्याला देण्यात आल्या. या वेळी विजय मल्ल्या त्याच्या आईसोबत होता. त्याने लोकांना व पत्रकारांना विनंती केली की माझ्या आईला त्रास होईल असं काही करू नका.
दरम्यान विजय मल्ल्या या प्रकारानंतर थेट व्हीआयपी साठी राखीव असलेल्या जागेवरून सामन्याचा आस्वाद घेतला. यावेळी त्याच्या मुलानेही त्याला कंपनी दिली. भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना जिंकल्यानंतर विजय मल्ल्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून आनंद व्यक्त करत विराट कोहली व भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.
Great to watch cricket with my son and even sweeter to see India’s emphatic victory over Australia. Congratulations to @imVkohli and his team pic.twitter.com/R01aB1WbSA
— Vijay Mallya (@TheVijayMallya) June 9, 2019