Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ज्येष्ठ अभिनेते व साहित्यिक गिरीश कर्नाड यांचं देहावसान

ज्येष्ठ अभिनेते व साहित्यिक गिरीश कर्नाड यांचं देहावसान

बंगळुरू: भारतीय नाट्यविश्वातलं एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व ज्येष्ठ अभिनेते आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचं आज (१० जून) बंगळुरू येथे निधन झालं. मृत्यूसमयी ते ८१ वर्षांचे होते. गेले अनेक दिवस ते आजारी होते. गिरीश कर्नाड दिग्दर्शित नागमंडल, तुघलक, हयवदय ही काही गाजलेली नाटकं होती.

गिरीश कर्नाड यांचा जन्म १९३८ साली माथेरान येथे झाला. कर्नाड यांनी दाक्षिणात्य चित्रपटांसोबत मराठी, हिंदी चित्रपटांमध्येही आपला अमिट ठसा उमटवला होता. मराठीत त्यांनी स्मिता पाटील यांच्यासोबत ‘उंबरठा’ या चित्रपटात काम केले होते. शिवाय, चॉक अँड डस्टर, लाईफ गोज ऑन, इक्बाल आणि टायगर झिंदा है हे काही त्यांचे गाजलेले बॉली हिंदी चित्रपटसृष्टीतील चित्रपट. १९७४ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आतापर्यंत १० वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित कर्नाड यांना १९९४ साली मनाच्या साहित्य अकादमी पुरस्काराने, तर १९९८ साली ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *