Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

युवराज सिंगने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून घेतली निवृत्ती

युवराज सिंगने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून घेतली निवृत्ती

नवी दिल्ली: भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ने आज अपेक्षेप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली. त्याने प्रेस काँफेरन्स च्या माध्यमातून याची घोषणा केली. युवराज सिंग गेल्या काहि काळापासून भारतीय टीम च्या बाहेर आहे तसेच वर्ल्डकप मध्येही त्याची निवड झाली नव्हती. युवी ने २०११ चा वर्ल्डकप जिंकण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. कॅन्सर शी लढाई जिंकल्यानंतर त्याने क्रिकेट कॅज्या मैदानावर पुनरागमन केले होते, पण काही विशेष प्रदर्शन त्याला करता आले नाही.

निवृत्तीची घोषणा केल्यानंतर भावुक झालेला युवराज सिंग म्हणाला की मी कधीच हार मानली नाही. २०११ चा विश्वचषक जिंकणं माझ्यासाठी मोठ्या स्वप्नासारखं होतं. मी माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. युवराज ने ३०४ वनडे सामने खेळत ८७०१ रन बनवले असून ५८ टी-२० सामने पण खेळले आहेत ज्यात त्याने ११७७ रन बनवले आहेत. त्याच्या नावावर असलेला महत्वपूर्ण विक्रम म्हणजे २००७ साली टी-२० वर्ल्डकप सामन्यात इंग्लंड च्या स्टुअर्ट ब्रॉड च्या बॉलिंग वर एकाच ओव्हर मध्ये मारलेले ६ सिक्स. ज्यामुळे तो सिक्सर मॅन म्हणूनही ओळखला जाऊ लागला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *