वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याला विरोध करणाऱ्यांना दोन दिवसांसाठी अंदमानात पाठवा
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त विधान केले असून त्यामुळे महाशिवआघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या प्रश्नाबाबत पत्रकाराने केलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, “वीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देणे हे राज्याच्या नव्हे तर केंद्राच्या आखत्यारीत येते. पण वीर सावरकरांना पुरस्कार दिला गेलाच पाहिजे. त्यांच्या भारतरत्न पुरस्काराला विरोध करणाऱ्यांना दोन दिवस तरी अंदमानात सावरकरांना ज्या ठिकाणी शिक्षा झाली तेथे पाठवायला हवे.”
या नव्या वक्तव्यामुळे काँग्रेस नेते विशेषकरून पृथ्वीराज चव्हाण काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.
