Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘वायू’ चक्रीवादळाचा उत्तर कोकण करत गुजरात च्या दिशेने प्रवास

‘वायू’ चक्रीवादळाचा उत्तर कोकण करत गुजरात च्या दिशेने प्रवास

मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेलं चक्रीवादळ ‘वायु’ गुजरातच्या आणखीन जवळ पोहोचलं आहे. हवामान विभागानुसार उद्या १३ जुन ला सकाळी वादळ गुजरातला धडकेल. वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने हाय अलर्ट जाहीर केला आहे.

गुजरातवर घोंगावणाऱ्या ‘वायू’ चक्रीवादळाच्या धोक्याला पाहता समुद्रातून सर्व मच्छीमारांना बाहेर बोलावण्यात आलं आहे. एनडीआरएफ व सेनेच्या जवानांना किनारी भागात तैनात करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी सखल भागात लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासोबत आपल्या मंत्र्यांना वादळ प्रभावित विभागात राहण्यास सांगितले आहे.

गुजरातच्या आधी महाराष्ट्राच्या किनारी भागात चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळाला. मुंबईत आज सकाळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक झाड उन्मळून पडलं त्याखाली एक दुचाकीस्वार आला. त्याचवेळी हवामान विभाग मुंबई चे उपसंचालक म्हणाले की चक्रीवादळामुळे उत्तर कोकणातल्या किनारी भागात हवेचा जोर जास्त राहील.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *