मोदीजी चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा: हार्दिक पटेल चा एक सल्ला आणि त्यावर लोकांनी केले ट्रोलिंग
गुजरात: भारतीय हवाई दलाचं बेपत्ता विमान एएन 32 चे अवशेष काल सायंकाळी अखेर अरुणाचल प्रदेशातील तातोपासून ईशान्येकडे १२ हजार फूट उंचीवर आढळले आहेत.
दरम्यान काल गुजरातमधील पाटीदार समाजाचे व काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी चीनवर विमान अपहरणाचा थेट आरोप करत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चीनवर हल्ला करण्यासाठी जाहीर पाठिंबा देणारे एक ट्विट करत कल्लोळ उडवून दिला. ज्यानंतर नेटिझन्स नी त्यांची मोठ्या प्रमाणात टिंगल उडवली.
हार्दिक पटेल आपल्या ट्विट मध्ये म्हणले की, “चीन मुर्दाबाद होता आणि मुर्दाबाद राहणार, चीनला सांगू इच्छितो की आमचं विमान AN-32 आणि जवान परत करा. मोदी साहेब चिंता करू नका, आम्ही सारे आपल्या सोबत आहोत. चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा आणि आपल्या जवानांना परत आणा.”
यावर हार्दिक यांना एका नेटिझन ने चिंता न करण्याबाबत बोलत विमानाचे अवशेष मिळाले असून अरुणाचल प्रदेश भारतातच आहे, बातम्या पाहत जा असा सल्ला देत त्यांची खिल्ली उडवली आहे.
https://twitter.com/HardikPatel_/status/1138363372934557696?s=19
https://twitter.com/indiantweeter/status/1138390707553546242?s=19
https://twitter.com/ChhayaGupta13/status/1138470950377332739?s=19
