उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीं सकट दिग्गज नेत्यांना निमंत्रण
मुंबई: आजच्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देशातल्या अनेक दिग्गज नेत्यांना देण्यात आले आहे. ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा व पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, द्रमुक पक्षाचे एम. के. स्टॅलिन या दिग्गजांचा समावेश आहे. काँग्रेसनेही विविध राज्यातील आपल्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिले आहे.