Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उदयनराजेंना धक्का, सातारा लोकसभा पोटनिवडणूक तूर्तास लांबणीवर

उदयनराजेंना धक्का, सातारा लोकसभा पोटनिवडणूक तूर्तास लांबणीवर

सातारा: आज दुपारी १२ वाजता निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून बरोबर ३ दिवसांनी २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

२ राज्यातील विधानसभा निवडणुकींसोबत देशातील जवळपास ६४ मतदारसंघात पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. पण अपेक्षेप्रमाणे सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम काही घोषित केला गेला नाही. यामुळे छत्रपती उदयनराजे भोसलेंना धक्का बसल्याचे मानले जाते. उदयनराजेंनी थोड्या घाईघाईतच आपल्या खासदारकीचा राजीनामा देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभे सोबत सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूकही झाली असती तर उदयनराजेंना नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील बहुमतापेक्षा जास्त बहुमत मिळवून निवडून आले असते इतकं नक्की.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *