Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मुख्यमंत्र्यांची ठाण्यातील सभा फ्लॉप गेल्यामुळे राज्यमंत्र्यांकडून कार्यकर्त्यांना मिळाला डोस

मुख्यमंत्र्यांची ठाण्यातील सभा फ्लॉप गेल्यामुळे राज्यमंत्र्यांकडून कार्यकर्त्यांना मिळाला डोस

ठाणे: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्व पक्षांच्या महाराष्ट्रभर सभा चालू आहेत. शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभांना गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पण काही ठिकाणी सत्ताधारी भाजपला वेगळ्याच डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे. भाजपच्या ठाण्यातील सभेचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचे दृष्य पाहायला मिळत आहे.

आमदार संजय केळकर यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक सभा लावण्यात आली होती. पण या सभेला फारच कमी लोकं जमल्यामुळे भाजप-शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना दोष देत हात वर केले. याची दखल घेत राज्यमंत्री रविंद चव्हाण यांनी गाफील राहू नये असा सल्ला देत भविष्यात अशी नाचक्की पुनः होऊ नये, म्हणून खातीरदारी बाळगण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्ते यांना केल्याचे समजते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *