तारीख पे तारीख…बहुमत चाचणीवर सर्वोच्च न्यायालय उद्या देणार निकाल
मुंबई: महाराष्ट्रात सुरू झालेल्या सत्ता संघर्षाच्या खेळावर सर्वोच्च न्यायालयाने निकालासाठी आणखीन एक दिवस वेळ घेतला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेऊन उद्या साडेदहा वाजता न्या. एन. व्ही. रामणा, न्या. अशोक भूषण व न्या. संजीव खन्ना यांचे खंडपीठ निर्णय देईल. शिवसेनेच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कपिल सिब्बल तर भाजपच्या वतीने मुकुल रोहतगी यांनी न्यायालयात बाजू मांडली.
