Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शेवटी तो क्षण आलाच, मॉन्सूनचं आज केरळात आगमन निश्चित : स्कायमेट

शेवटी तो क्षण आलाच, मॉन्सूनचं आज केरळात आगमन निश्चित : स्कायमेट

केरळ: फार मोठ्या अवकाशाने शेवटी ती वेळ आलीच जेव्हा मॉन्सून साठीची अनुकूल परिस्थितीचा योग जुळून आला आहे. स्कायमेट च्या मते मॉन्सून च्या आगमनासाठी ओ.एल.आर., हवेची गती तसेच क्षेत्र आणि पाऊस या तीनही गोष्टी जुळून येणं गरजेचं आहे. जे सध्या जुळून आलं आहे.

बुधवारी म्हणजेच ५ जून रोजी केरळ, कर्नाटक चा किनारी हिस्सा आणि लक्षद्वीप बेटांच्या समूहातील काही भागात चांगला पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. मागच्या २४ तासात ही चांगला पाऊस पडला आहे. स्कायमेट ने आपल्या अपडेट मध्ये सांगितलं आहे की जर केरळ, लक्षद्वीप बेटांचा समूह आणि कर्नाटकच्या किनारी भागात १४ स्थानावरील ६०% क्षेत्रात सलग दोन दिवस जर २.५ मिलिमीटर व अधिकच्या पावसाची नोंद झाली तर मॉन्सून च्या आगमनाची घोषणा करण्यात येते. आणि आनंदाची गोष्ट अशी की सध्या तसेच अनुकूल वातावरण आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *