Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

दुर्मिळ आणि मौल्यवान कौशल्यं शिकून घ्या आणि मग ती कौशल्यं तुमच्या करिअरमध्ये वापरा..!

दुर्मिळ आणि मौल्यवान कौशल्यं शिकून घ्या आणि मग ती कौशल्यं तुमच्या करिअरमध्ये वापरा..!

कॅलनं कामाचे ‘जॉब, करिअर आणि कॉलिंग’ असे तीन प्रकार केले आहेत. यापैकी ‘जॉब’ करणं म्हणजे महिन्याची सगळी बिलं भरता येणं. ‘करिअर’ करणं म्हणजे सातत्यानं चांगलं काम करणं आणि ‘कॉलिंग’ म्हणजे आपण करतो ते काम आपल्या आयुष्याचा आणि व्यक्तिमत्वाचा महत्वाचा हिस्सा आहे असं वाटून ते काम करणं. कॉलिंगपर्यंत पोचण्यासाठी पॅशनपेक्षा कामात मिळवलेलं कौशल्य कसं महत्वाचं ठरतं हे एका महिलेच्या उदाहरणावरुन कॅलनं स्पष्ट केलं आहे.

एक महिला जाहिरातींच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीत अनेक वर्षं नोकरी करत होती. मार्केटिंगबरोबरच जाहिरातविश्वातली अनेक कौशल्यं तिनं आत्मसात करुन घेतली होती. पण तिची खरी पॅशन होती योगासनं..! तिला त्यातला प्रशिक्षक व्हायचं होतं. मग ती पॅशन पूर्ण करण्यासाठी तिनं आधीची नोकरी सोडली. ४००० डॉलर्स आणि २०० तास घालवून योगासनांचं प्रशिक्षण घेतलं. ते प्रशिक्षण पूर्ण करताना तिला स्वत:ला आसनं जमायला लागली. पण एक गोष्ट तिच्या चांगलीच लक्षात आली. ती म्हणजे, तिचे शिक्षक ज्या सहजतेनं आसनं करत होते ते कौशल्यं जमायला तिला किमान १० वर्षं सराव करण्याची गरज होती. मात्र हा धडा मिळेपर्यंत तिनं जाहिरात क्षेत्रातली नोकरी सोडली होती आणि ज्या क्षेत्रात तिच्याकडे कौशल्यं नव्हती तिथे ती येऊन पडली होती. 

यालाच कॅल करिअर कॅपिटल थिअरी म्हणतो. म्हणजे, काम करायला सुरुवात करा. दुर्मिळ आणि मौल्यवान कौशल्यं शिकून घ्या आणि मग ती कौशल्यं तुमच्या करिअरमध्ये वापरा..! 

  • नीलांबरी जोशी (लेखिका – कॉर्पोरेट कल्लोळ, समुपदेशक)
Book So Good they can’t ignore you

 

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *