Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सायनाच्या बायोपिकमधून श्रद्धा आऊट आणि ‘ही’ अभिनेत्री इन

सायनाच्या बायोपिकमधून श्रद्धा आऊट आणि ‘ही’ अभिनेत्री इन

गेल्या वर्षभरापासून चर्चेत असलेला भारताची फुलराणी सायना नेहवालचा जीवनपट पुन्हा रखडला आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तिने या चित्रपटातून एक्झिट घेतल्याचं समजतंय.

सप्टेंबर २०१८ मध्ये या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात झाली होती. मात्र शुटींग सुरू होताच श्रद्धाला डेंग्यू झाल्यामुळं तिनं काही काळ ब्रेक घेतला होता. एप्रिलमध्ये पुन्हा सायनाच्या चित्रपटाचं काम सुरू होणार होतं मात्र तिनं आधीच दुसऱ्या चित्रपटांसाठी तारखा दिल्या असल्यामुळं तिला चित्रपट सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. ‘छिछोरे’ आणि ‘स्ट्रीट डान्सर’ या दोन चित्रपटांमध्ये सध्या श्रद्धा व्यस्त आहे. तसंच, प्रभाससोबतचा ‘साहो’ चित्रपट ऑगस्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पण आता अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या जागी अभिनेत्री परिणीती चोप्रा सायनाच्या भूमिकेत झळकणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *