शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने राजभवनात सादर केली पाठिंब्याची यादी; पण राज्यपाल अनुपस्थित
मुंबई: आज सकाळी महाशिवआघाडीचे नेते संख्याबळाचा दावा करण्यासाठी राजभवनावर पोहोचले. आज राजभवन येथे अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या आमदारांची सह्यानिशी यादी त्यांच्याकडे सादर केली.
यावेळी त्यांनी सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे बहुमतासाठी आवश्यक संख्येहून अधिक संख्या बळ असल्याने सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्यात यावे अशी विनंती करून सत्तास्थापनेचा दावा केला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, खासदार विनायक राऊत व अशोक चव्हाण उपस्थित होते. पण यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी हे निवेदन स्वहस्ते का स्वीकारले नाही हे एक कोडेच आहे.
आज राजभवन येथे अधिकाऱ्यांची भेट घेऊन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या आमदारांची सह्यानिशी यादी त्यांच्याकडे सादर केली. pic.twitter.com/OZP7jzsoDn
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 25, 2019
