शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
आज सायंकाळी होणाऱ्या महायुतीच्या सभेनिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापुरात दाखल झाले आहेत. आज दोघांनी एकत्र आपल्या नेत्यांसोबत करविरनिवासींनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, आदेश बांदेकर तसेच शिवसेना व भाजप चे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. आज सायंकाळी तपोवनच्या भव्य मैदानावर होणाऱ्या सभेसाठी युतीचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.