Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

शरद पवारांनी उडवली शिवसेनेच्या वचननाम्याची खिल्ली म्हणाले, “तुम्हाला राज्य करायला सांगतोय की स्वयंपाक करायला सांगतोय हाच प्रश्न पडलाय”

शरद पवारांनी उडवली शिवसेनेच्या वचननाम्याची खिल्ली म्हणाले, “तुम्हाला राज्य करायला सांगतोय की स्वयंपाक करायला सांगतोय हाच प्रश्न पडलाय”

मुंबई/बार्शी: शिवसेनेने आज आपला वाचननामा प्रसिद्ध केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला १० रुपयात सकस आहार देण्याचे आश्वासन दिले.

याच आश्वासनाची खिल्ली उडवत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, “आता एकायला येतंय की १० रुपयांत जेवणाची थाळी मिळेल. राज्यात कुठे आणि किती ठिकाणी ही थाळी देणार. तुम्हाला राज्य करायला सांगतोय की स्वयंपाक करायला सांगतोय हाच प्रश्न पडलाय.
अन्नधान्याचा प्रश्न आहेच, पण त्यासोबतच राज्यात इतर देखील प्रश्न आहेत.”

संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारासाठी ते आज बार्शीत आले होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *