Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“एक माय का लाल दाखवून द्या जो सलग १४ वेळा निवडणूक जिंकला असेल” शरद पवारांचा गृहमंत्री अमित शहांना सवाल

“एक माय का लाल दाखवून द्या जो सलग १४ वेळा निवडणूक जिंकला असेल” शरद पवारांचा गृहमंत्री अमित शहांना सवाल

बार्शी: संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार निरंजन भूमकर यांच्या प्रचारासाठी आज शरद पवार बार्शीत आले होते. राज्याच्या राजकारणात बदल करण्यासाठी मी लोकांशी संपर्क साधतो आहे. काही लोक विकासाचे नाव सांगून सोडून गेले. बार्शीकर अशा पळपुट्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. असे म्हणत यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतून अन्य पक्षांत पक्षांतर केलेल्या नेत्यांवर टीकास्त्र सोडलं.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका प्रचारसभेतील वक्तव्याचा समाचार घेताना ते म्हणाले, “मुख्यमंत्री म्हणतात इथे सक्षम विरोधक नाहीत. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. पण कुस्ती पैलवनाशी होते, इतरांशी नाही. जर सत्ताधाऱ्यांच्या मते इथे काही ताकदीच्या निवडणुका नाहीत तर मग देशाचे पंतप्रधान, पंतप्रधान राज्यात प्रचाराला का येतात?”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवारांच्या कर्तृत्वाबाबत प्रश्न विचारला होता त्याला उत्तर देताना ते म्हणाले, “देशाचे गृहमंत्री म्हणतात शरद पवार यांनी ५० वर्षांत काय केलं? त्यांना एकच प्रश्न करतो की तुमच्यातील एक माय का लाल दाखवून द्या जो सलग १४ वेळा निवडणूक जिंकला असेल.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *