फक्त १ रुपयात २०० आरोग्य चाचण्या; शिवसेनेच्या वचननाम्यात आहेत अशी अनेक आकर्षक आश्वासनं
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज आपला वाचननामा प्रसिद्ध केला. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, उपनेत्या प्रियांका चतुर्वेदी, खासदार अनिल देसाई व सचिव सुरज चव्हाण उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “उज्ज्वल महाराष्ट्राचे स्वप्न घेऊन ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत. मी जी महाराष्ट्राला वचने दिली आहेत आणि जी राहिली आहेत ती आज या वचननाम्यातून जाहीर करत आहे.”
वाचननाम्यातील तपशीला बाबत बोलताना ते म्हणाले की, “जन आशीर्वाद यात्रेत महाराष्ट्रभर फिरताना जे प्रश्न समाजाचे दिसले त्याबाबत वचने या मध्ये आहेत. हा वचननामा महिला आणि शिवसेना नेते यांनी मिळून बनवलेला आहे. १० रुपये मध्ये आम्ही सकस आहार देणार आहोत. १ रुपये मध्ये २०० आरोग्य चाचण्या करण्यात येणार आहेत आणि हे करताना आर्थिक समोतोल ढलणार नाही याची काळजी घेतली आहे.” काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जाहिरनाम्यातील स्थानिक भूमीपुत्रांच्या नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले की, “भूमिपुत्रांच्या न्यायाबाबत बाळासाहेब ५० वर्षांपूर्वी जे बोलले त्या बाबत इतरांना आता जाग आली आहे. तेव्हा प्रंतियावाद शिवसेना घालत आहे असे बोलले जात होते.”
वाचननाम्यातील काही महत्त्वाचे मुद्दे
- या कॅन्टिनमध्ये १० रुपये ते १०० रुपयांपर्यंत अन्न मिळू शकेल, जेणेकरून सर्वांना अन्न मिळू शकेल
- प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिला बचत गटांच्या साहाय्याने कॅन्टिन उभारणार
- ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विशेष बसेसची सोय
- तीर्थक्षेत्रांच्या प्रवासासाठी समन्वय केंद्रांची स्थापना करणार
- खतांचे दर पाच वर्ष स्थिर राहतील अशी व्यवस्था करणार
- पिकविमा योजनेत नुकसानग्रस्त शेतकऱ्याला विमा मिळण्याची सोय करणार
- शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार
- गरजू शेतकऱ्यांना दरवर्षी १० हजार रुपये देणार
संपूर्ण वाचननामा पुढील संकेतस्थळावर वाचू शकता.
https://www.shivsenavachannama2019.com/index-mi.html
