Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्ट्रवादीला मोठा धक्का, सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश

राष्ट्रवादीला मोठा धक्का, सचिन अहिर यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कामगार मंत्री सचिन अहिर यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत साऱ्यांनाच धक्का दिला आहे यावेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले.

राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना फार आनंद होत नाहीये, परंतु काही वेळेला कठोर निर्णय घ्यावे लागतात असे यावेळी सचिन अहिर म्हणाले. सध्या वरळी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सुनील शिंदे आमदार आहेत. त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर यांचा पराभव केला होता.

असे कळते की सचिन अहिर शेजारच्या भायखळा विधानसभा मतदारसंघातूम निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. सध्या तेथे एमआयएम चे वारीस पठाण विद्यमान आमदार आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *