Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला; अंजली दमानिया यांचा खोचक सवाल

राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला; अंजली दमानिया यांचा खोचक सवाल

मुंबई: कोहिनूर मिल व्यवहारात आयएलएफएस च्या सहभागा संदर्भात चौकशीसाठी राज ठाकरे आज मुंबईतील ईडी च्या कार्यालयात हजर होत आहेत. थोड्याच वेळापूर्वी ते आपल्या दादर येथील निवासस्थानाकडून ईडी च्या कार्यालयादिशेने सहपरिवार घरून निघाले होते.

यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला, मुलगा अमित, मुलगी उर्वशी, सून मिताली आणि बहिणही होते. या पार्श्वभूमीवर आप नेत्या अंजली दमानिया या ट्विटरवर राज ठाकरेंवर खोचक टीका करताना म्हणाल्या की, “राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ED च्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगी, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा drama? का सहानभूती गोळा करण्याचा जा प्रयत्न.”

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *