Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

काका राज ठाकरे आणि पुतण्या आदित्य ठाकरे आज नाशिक मध्ये

काका राज ठाकरे आणि पुतण्या आदित्य ठाकरे आज नाशिक मध्ये

नाशिक: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. गोदाकाठी यशवंतराव महाराज पटांगणावर सायंकाळी ५ वाजता आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.

तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधात आवाज उठवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा जाहीर सभा आज नाशिकमध्ये होणार आहे. राज ठाकरे या सभेत कोणता व्हिडीओ दाखविणार याचीच चर्चा आता सर्वत्र रंगली आहे. सायंकाळी ६ वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणार आहे.

नाशिकमध्ये या दोन्ही सभेची तयारी पूर्ण झाली आहे. प्रथमच ठाकरे कुटुंबातील काका पुतण्या प्रचारासाठी आमनेसामने येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या सर्वच जाहीर सभांचे रेकॉर्ड नाशिकमध्ये मोडले जाण्याची शक्यता आहे. यामुळे या दोन्ही सभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *