
राज्यात आजही गारपीट आणि अवकाळी पावसाचा कहर
पुणे, दि.१८: देशाच्या विविध भागात आज पावसानं हजेरी लावली. राजधानी दिल्लीत आज सकाळी हलका पाऊस झाला. दिवसभर दिल्लीत ढगाळ वातावरण होतं. येत्या दोन दिवसांत देशाच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे.
देशाच्या वायव्य भागात जास्त पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागानं पंजाब आणि हरयाणात मोहरीची तर मध्य महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात गहू आणि डाळींची कापणी शेतकऱ्यांनी पुढे ढकलावी असं आवाहन केलं आहे.अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा कहर आज राज्याच्या विविध भागातही सुरु राहिला.