Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला ८८५०३०३४६३ वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा

“महाराष्ट्र सरकारच्या विरोधात सातत्याने अपशब्द वापरण्याचे काम कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून केले जात आहे”

जयंत पाटील यांनी विधानसभेत केला निषेध

मुंबई, दि. १७: कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्टाबद्दल पुन्हा गरळ ओकली आहे. सीमा भागातील ८६५ गावांना महाराष्ट्राने योजना पुरविणे हा न माफ करता येण्यासारखा गुन्हा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमच्या लोकांना योजना पोहचविण्यासाठी जर ते अडवणूक करत असतील तर ते योग्य नाही, असे स्पष्ट मत आ. जयंत पाटील यांनी विधानसभेत मांडले.

बारामतीतील काही लोक गाई घेण्यासाठी कर्नाटकच्या सीमेलगत गेले असता बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गाड्या अडवून पैशाची मागणी केली. एका आरपीआय कार्यकर्त्याने त्यास विरोध केला असता त्यांच्यात भांडण होऊन हे प्रकरण पोलिसांकडे गेले. वाहन चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते स्थानिक भाषेत लिहिलेले असल्याने काही समजायला मार्ग नाही. १६० गाई गाभण आहेत. त्यांना चारा पाणी वेळेवर मिळत नाही. लोकांना जेवण मिळत नाही. त्या भागात अनेक राज्यातील लोक गाई-शेळ्या विकत घ्यायला येतात. मात्र महाराष्ट्रालाच हीन वागणूक का दिली जाते? महाराष्ट्र सरकारने त्वरित या शेतकऱ्यांना सोडवून महाराष्ट्रात परत आणावे, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

महाराष्ट्र सरकारच्या विरोधात सातत्याने अपशब्द वापरण्याचे काम कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून केले जात आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. निवडणूक जवळ येत असल्याने महाराष्ट्रविरोधी भूमिका घेत आगपाखड करणाऱ्या कर्नाटक सरकारची गांभीर्याने दाखल घ्यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *