पीएमसी बँक खातेधारकांसाठी खुशखबर; पैसे काढण्याची मर्यादा झाली ४० हजार रुपये
मुंबई: निर्बंधीत पंजाब आणि महाराष्ट्र बँक (पीएमसी) खातेधारकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने मोठा दिलासा दिला आहे. याआधी २५,००० रुपयांपर्यंत पैसे काढण्याची असलेली मर्यादा आता ४०,००० पर्यंत वाढवण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात पीएमसी बँकेत ४ हजार ३०० कोटींचा मोठा घोटाळा उघड झाला. तात्काळ आरबीआय ने ‘पीएमसी’ बँकेवर निर्बंध लादले. यानंतर मोठा गहजब माजला. सुरुवातील आरबीआयने १०,००० रुपये व नंतर २५,००० पर्यंतची रक्कम काढण्याची मुभा खातेधारकांना देण्यात आली होती. आज अजून थोडासा दिलासा देत पैसे काढण्याची मर्यादा वाढवत ती ४०,००० हजार रुपये करण्यात आली.
