Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अखेर नारायण राणेंनी भाजपमध्ये विसर्जित केला आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष

अखेर नारायण राणेंनी भाजपमध्ये विसर्जित केला आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष

कणकवली: गेले अनेक दिवस वेटिंग वर असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा आज अखेर भाजपमध्ये प्रवेश झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे नितेश राणे यांच्या प्रचार सभेत नारायण राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला. यावेळी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला.

गेले अनेक दिवस नारायण राणे यांचा भाजप प्रवेश अडकून पडला होता. पण आज अखेर त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त साधला गेला. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना व उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे लक्षणीय ठरेल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *