जागतिक महिला दिनानिमित्त महिलांकरिता आयोजित विविध स्पर्धा व कार्यक्रमांमध्ये सहभागाचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन
नवी मुंबई, दि. २७: नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागाच्या वतीने दि. ८ मार्च, २०२५ रोजीच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महापालिका क्षेत्रातील विविध क्षेत्रात कार्यरत कर्तृत्ववान महिलांना पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात येणार आहे. तसेच महिला, मुली, महिला बचत गट, महिला मंडळ, महिला संस्था यांनी उत्पादित केलेल्या वस्तुंची विक्री करण्यासाठी विनामूल्य स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे नमुंमपा कार्यक्षेत्रातील महिलांकरीता दि. ४ मार्च २०२५ रोजी (१) समुह गायन स्पर्धा, (२) महिला भजनी मंडळ भजन स्पर्धा तसेच दि. ५ मार्च २०२५ रोजी (३) समुह नृत्य स्पर्धा, (४) समुह नाटिका स्पर्धा, व (५) मंगळागौर स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धांची प्राथमिक फेरी महात्मा फुले स्मृती भवन, भूखंड क्र.१२/१३, तिसरा मजला, से-३, वाशी, नवी मुंबई या ठिकाणी सकाळी ९.०० वाजता घेण्यात येईल. तसेच दि. ८ मार्च, २०२५ रोजी जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या दिवशी स्पर्धांची अंतिम फेरी व विविध स्पर्धा पारितोषिक वितरण व पुरस्कार प्रदान समारंभ विष्णुदास भावे नाटयगृह, वाशी या ठिकाणी स. ९.०० वाजता संपन्न होईल.
या स्पर्धांमध्ये सहभागी होण्याकरिता तसेच पुरस्कार व विक्री स्टॉल याकरीता आवश्यक अर्ज सर्व आठ विभाग कार्यालये तसेच समाजविकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, पहिला मजला, से. ११, सी.बी.डी., बेलापूर येथे उपलब्ध आहेत. या ५ स्पर्धांमधील सहभागाकरिता अर्ज करण्याचा अंतिम दि. ३ मार्च २०२५ आहे. तसेच पुरस्कार व विक्री स्टॉलकरिता अर्ज करण्याचा अंतिम दि. ६ मार्च २०२५ आहे. दि. ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाकरिता उपस्थित असलेल्या महिलांकरिता कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वात शेवटी पैठणी लकी ड्रॉ स्पर्धा घेण्यात येईल.
पुरस्कार नामांकन व विक्री स्टॉल बाबतची सविस्तर माहिती, अर्ज, नियम, अटी व शर्ती महानगरपालिकेची सर्व आठही विभाग कार्यालये तसेच समाजविकास विभाग, नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर भवन, पहिला मजला, से. ११, सी.बी.डी., बेलापूर येथे शासकीय सुट्टया वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत उपलब्ध होतील तसेच स्विकारले जातील.
सदर विक्री स्टॉल उपलब्ध करुन घेण्यासाठी फक्त नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात वास्तव्यास असणा-या महिला, मुली, महिला बचत गट, महिला मंडळ, महिला संस्था अर्ज करू शकतात. दाखल केलेल्या अर्जांपैकी एक अथवा सर्व अर्ज कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार मा. आयुक्त किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी यांनी राखून ठेवला आहे याची संबंधितांनी नोंद घ्यावयाची आहे,
अधिक माहितीसाठी खालील दूरध्वनी क्रमांक संपर्कासाठी उपलब्ध आहेत.
बेलापूर विभाग – श्री. मोहन गायकवाड – 8652441101,
नेरुळ विभाग – श्री. किरण विश्वासराव 9819204145, श्रीम. प्रिती दातार – 9004098715
वाशी विभाग – श्री. संतोष सुपे – 8380987456, श्रीम. निलीमा धोंगडे – 9326540277
तुर्भे विभाग – श्रीम. स्वप्नाली म्हात्रे – 9082544474, श्री. जिज्ञेश देवरुखकर – 9004182412
कोपरखैरणे विभाग – श्रीम. स्मिता व्यवहारे – 8689868333, श्री. गजानन चव्हाण – 9322601805,
घणसोली विभाग – श्री. संतोष मोरे – 9136252624, श्री. संतोष गावित – 7977170237
ऐरोली विभाग – श्रीम. प्रतिक्षा हुंडारे – 8898329622, श्री. मनोहर राऊत – 9224641224
दिघा विभाग – श्री. विजय चव्हाण – 8291452781, श्री. हेमंत परते – 9545362568
