भटक्या व पाळीव श्वानांचे रेबीज लसीकरण करुन घेण्याचे आवाहन नमुमपा तर्फे आवाहन
नवी मुंबई, दि. २२: शासनाच्या आदेशानुसार दि. २२ सप्टेंबर २०२५ ते २८ सप्टेंबर २०२५ दरम्यान जागतिक रेबीज दिन (World Rabies Day) साजरा करणेबाबत सुचना प्राप्त झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार मे. ईन डिफेंस ऑफ एनिमल यांचे मार्फत भटक्या व पाळीव श्वानांचे रेबीज लसीकरण पालिकेच्या विविध विभागांत करण्यात येणार आहे. याकरिता विभागनिहाय दिनांक व वेळ जाहीर करण्यात आलेली आहे.
बेलापुर विभाग : दि. २४/०९/२०२५, सकाळी ०८.००ते दुपारी ०२.०० पर्यंत
नेरुळ विभाग : दि. २५/०९/२०२५, सकाळी ०८.०० ते दुपारी ०२.०० पर्यंत
वाशी विभाग : दि. २६/०९/२०२५, सकाळी ०८.००ते दुपारी ०२.०० पर्यंत
तुर्भे विभाग : दि. २७/०९/२०२५, सकाळी ०८.०० ते दुपारी ०२.०० पर्यंत
कोपरखैरणे विभाग : दि. २८/०९/२०२५, सकाळी ०८.०० ते दुपारी ०२.०० पर्यंत
घणसोली विभाग : दि. २९/०९/२०२५, सकाळी ०८.०० ते दुपारी ०२.०० पर्यंत
ऐरोली विभाग : दि. ३०/०९/२०२५, सकाळी ०८.०० ते दुपारी ०२.०० पर्यंत
दिघा विभाग : दि. ०१/१०/२०२५, सकाळी ०८.०० ते दुपारी ०२.०० पर्यंत
तरी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व पाळीव व भटके श्वान यांचे रेबीज लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी ९३२००५६५८५ अथवा ९३२००५६५९२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे सूचित करण्यात आले आहे.
