Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राष्ट्रवादीत फिरसे बगावत, नवी मुंबईतील नाईक समर्थक ५२ नगरसेवक व आ. संदीप नाईक भाजपच्या वाटेवर

राष्ट्रवादीत फिरसे बगावत, नवी मुंबईतील नाईक समर्थक ५२ नगरसेवक व आ. संदीप नाईक भाजपच्या वाटेवर

नवी मुंबई: गेल्या विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस मधून भाजपमध्ये जाणाऱ्यांचं आउटगोइंग अजूनही चालूच आहे. राष्ट्रवादी च्या संस्थापकांपैकी एक असलेल्या मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड, राष्ट्रवादी महिला आघाडी प्रमुख चित्रा वाघ, साताऱ्याचे आमदार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यानंतर आता नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र आ. संदीप नाईक व नवी मुंबई महानगर पालिकेतील ५२ नगरसेवक भाजपच्या वाटेवर आहेत.

याबाबत आज या सर्व नगरसेवकांची आ. संदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत सर्व नगरसेवकांनी माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा अशी गळ घातली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ऐरोली व बेलापूर विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी पिछाडीवर होती. त्या नंतरच नाईक परिवारात पक्षांतराचे वारे फिरायला लागले. येत्या ३१ जुलै रोजी पक्षांतराचा मुहूर्त साधला जाणार असल्याचे कळते. पण या वेळी गणेश नाईक राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देतील का हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *