Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

समाज माध्यमे आणि युवक या विषयावर नीलांबरी जोशी यांचे ३० जुलै रोजी पेण येथे व्याख्यान

समाज माध्यमे आणि युवक या विषयावर नीलांबरी जोशी यांचे ३० जुलै रोजी पेण येथे व्याख्यान


समोरची व्यक्ती काहीतरी बोलत असेल तर कानात घातलेले स्मार्टफोनचे पांढरे इअरफोन्स काढणं हा अनेक जणांना चक्क त्रास वाटतो इतके आपण वास्तवातल्या माणसांपासून दुरावत चाललो आहोत. यावरुन “व्यक्ती हेच विकाऊ उत्पादन झालंय” असं युवाल नोहा हरारी म्हणतो. तर “सोशल मिडियामागच्या उद्योजकांनी आपण एका उत्कृष्ट जगाची निर्मिती करतोय असं ढोंग करणं थांबवावं.. ते फक्त मुलांना तंबाखूसारखं व्यसन लावणारी उत्पादनं विकतायत, कारण तुमचे लाईकस् तपासणं हा धूम्रपानाच्या व्यसनाचा नवीन प्रकार आहे” असं “डिजिटल मिनिमलिझम”चा लेखक कॅल न्यूपोर्ट म्हणतो. इंटरनेटच्या ३०० कोटी यूजर्सपैकी ९० टक्के युजर्स टीनएजर्स आहेत आणि या मोबाईल जनरेशनला सोशल मिडियाचं व्यसन पार मृत्यूपर्यंत पोचवतंय. “समाजमाध्यमं आणि युवक” याच विषयावर पेणच्या भाऊसाहेब नेने कॉलेजमध्ये मी ३० जुलैला सकाळी १० वाजता बोलणार आहे.. ! सर्वांना आमंत्रण..!

– नीलांबरी जोशी

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *