Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

एनडीए च्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदासाठी एकमताने निवड

एनडीए च्या बैठकीत नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान पदासाठी एकमताने निवड

नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी च्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये सुरू झाली आहे. या बैठकीत औपचारिकरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना NDA चे नेते म्हणून निवड झाली आहे. याच बरोबर सरकार स्थापनेसाठी पुढील कार्यवाही केली जाईल. ही बैठक संसदेच्या सेंट्रल हॉल मध्ये ५ वाजता सुरू झाली.

या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, नितीन गडकरी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी उपस्थित आहेत. NDA चा प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तसेच अकाली दलाचे प्रकाशसिंग बादलही उपस्थित आहेत. या बैठकी नंतर नरेंद्र मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटून सरकार स्थापनेचा दावा सादर करतील.

एनडीए चे या वेळी ३५२ खासदार आहेत, ज्यात ३०३ एकट्या भाजपचे आहेत. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना आहे, ज्यांचे १८ खासदार आहेत. मोदींना आधीच एनडीए चे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं गेलं होतं, आजच्या या बैठकीत त्यांची निवड होणं ही फक्त औपचारिकता आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *