Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नंदुरबारमध्येही शॉपिंग मॉल्स मध्ये प्रवेशासाठी लसीकरण प्रमाणपत्र दाखविणे अनिवार्य

शॉपिंग मॉल्स मध्ये प्रवेशासाठी लसीकरण प्रमाणपत्र दाखविणे अनिवार्य

नंदुरबार: शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करुन नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स दररोज रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र तिथे प्रवेशासाठी लसीकरण प्रमाणपत्र दाखविणे अनिवार्य असेल असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.

तिथल्या कर्मचारी आणि ग्राहकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा घेणं तसंच दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेले असणं बंधनकारक राहील. प्रवेशद्वारावर लसीकरण प्रमाणपत्र आणि फोटोसहीत ओळखपत्र दाखविणे आवश्यक असेल.तर अठरा वर्षां खालील वयोगटातील मुलांना वयाचा पुरावा देणं अनिवार्य असल्याचं या आदेशात म्हटलं आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातही अशाचप्रकारे सर्व नियमावलींचं पालन करून शॉपिंग मॉल्स दररोज रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *