मुंबईत पुन्हा बरसल्या धुवांधार सरी, सगळ्यांना जवळ येणाऱ्या २६ जुलै चा धसका
मुंबई: गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुनः एकदा हजेरी लावली आहे. काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सकाळी मुंबईतील सखल भागात पाणी साचले होते.
हिंदमाता, चेंबूर भागात पाणी साचल्यामुळे सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना व विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागली. तसेच जागोजागी साचलेल्या पाण्यामुळे रेल्वे व बेस्ट बस वाहतुकीवरही परिणाम झाला होता. ट्रेन सुमारे १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर पाणी साचलं होतं. येत्या ४८ तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
