भारताच्या दबावानंतर मसूद अजहरचे कार्यालय पाक सरकारच्या ताब्यात
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने सर्व बाजूने पाकिस्तनाला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पाक सरकारने जैश ए मोहम्मदचा दहशतवादी मसूद अजहरच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय सुद्धा पाकिस्तान सरकारने ताब्यात घेतलं आहे.
बहावलपूरमधील मदरसातूल साबिर आणि जामा ए मशिद सुभानल्लामधील मसूदच्या जैश ए मोहम्मदचं मुख्यालय पंजाब सरकारने आपल्या ताब्यात घेतलं आहे. सध्या पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे पोलीस मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत.
१४ फेब्रुवारी रोजी जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये भारताच्या सीआरपीएफ जवानांवर भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता त्यात भारताचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए मोहम्मदनं घेतली होती. या आत्मघाती हल्ल्यानंतर भारतात एकच संतापाची लाट उसळली, तर जगभरातील प्रमुख देशांनी भारताला कारवाईसाठी पाठींबा दर्शवला होता. जागतिक दबावमुळे पाकिस्तान भयभीत झाल्याने पाक सरकारने दहशतवादावर कारवाई सुरू केली आहे. २१ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने मुंबई हल्ल्याचा सुत्रधार हाफीज सईद याच्या फलह-ए-इन्सानियत आणि जमात-उद-दावा या संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
