Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आवडत्या नोकरीची सुवर्णसंधी; भेट द्या पनवेल येथील बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला

आवडत्या नोकरीची सुवर्णसंधी; भेट द्या पनवेल येथील बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याला

पनवेल: शनिवार दिनांक २२ जून रोजी पनवेल मधील पिल्लई कॉलेज च्या प्रांगणात महाराष्ट्र शासनातर्फे उद्योग विभागाच्या पुढाकाराने बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार असून १०वी/१२वी उत्तीर्ण/अनुत्तीर्ण ते सर्व शाखांच्या पदवी/पदविकाधारक उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दि. १२ जून ते २० जून, २०१९ दरम्यान
Https://balasahebthackerayrojgarmelava.com या संकेतस्थळावर, मोबाईल ऍपवर किंवा ७४००१ ५५५०९ / ०२२-२५७४४२०५ या क्रमांकावर नोंदणी करावी. नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना त्याचा नोंदणी क्रमांक त्वरित मिळेल.

ज्या उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी शक्य नाही त्यांच्यासाठी ऑफलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑफलाईन नोंदणीचे फॉर्म्स पुढील ठिकाणी उपलब्ध आहेत:

१) जिल्हा उद्योग केंद्र, रायगड जिल्हा : ०२४१ – २२२०९९
२) पनवेल इंडस्ट्रियल इस्टेट कार्यालय, पनवेल : ०२२ – २७४५२३६०
३) औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल : ०२२ – २७४५२४९१

रोजगार मेळाव्याचे स्थळ आणि वेळा
शनिवार दिनांक २२ जून, २०१९ रोजी
सकाळी १०.०० ते दुपारी २.०० पर्यंत
स्थळ: पिल्लई कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, पिल्लई कॅम्पस, सेक्टर-१६, नवीन पनवेल – ४१०२०६.

हा रोजगार मेळावा शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे असल्यामुळे या निमित्ताने पनवेल तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पनवेल, उरण, खोपोली, पेण, कर्जत इथल्या शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ पातळीवरून तसे आदेश देण्यात आल्याचे कळते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *