गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
गेले बरेच महिने स्वादुपिंडाच्या कर्करोगाने आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना शनिवारी रात्री उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. त्यांच्यावर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपी करण्यात येणार आहे. पर्रीकरांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे ह्यांनी गोमेकॉत जाऊन त्यांची भेट घेतली.
राणे म्हणाले कि,” मुख्यमंत्री पर्रिकरांची प्रकृती स्थिर आहे आणि चिंता करण्याचे कोणतेच कारण नाही. डॉक्टरही त्यांच्यावरील सर्व इलाजांवर समाधानी आहेत. एक दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवून नंतर त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. ह्या संदर्भातली माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
Met with the hon’ble Chief Minister at GMC, his condition is stable and there is nothing to speculate. His parameters are good and the doctors are happy with his present condition. He will be kept under observation for a day and will be discharged tomorrow@goacm @AmitShah
— VishwajitRane (मोदी का परिवार) (@visrane) February 23, 2019