Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

एकनाथ खडसेंना भाजपने तिकीट नाकारलं, खडसे पुन्हा वनवासात ?

एकनाथ खडसेंना भाजपने तिकीट नाकारलं, खडसे पुन्हा वनवासात ?

मुक्ताईनगर: भाजपच्या आतापर्यंत तीन उमेदवार याद्या जाहीर झाल्या पण या तीनही याद्यांमध्ये एकनाथ खडसे यांचं नाव कुठेच आढळलं नाही. या नंतर एकनाथ खडसेंनी बंड पुकारलं पण आज पत्रकार परिषद घेत त्यांनी आपण पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचे जाहीर केले.

यावेळी ते म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीचं तिकिट देणार नाही असं मला पक्षानं सांगितलं. काहीही हरकत नाही. माझ्यासाठी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता एकनाथ खडसे आहे”. पुढे उपस्थित कार्यकर्त्यांना ते म्हणाले की आपण भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. तुम्ही माझ्यासाठी रात्रंदिवस इथे आहात हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आपण पक्षाला बळकटी आणण्याचं काम केलं आहे. पक्षाचा निर्णय मान्य आहे असे म्हणत त्यांनी माघार घेत असल्याचे जाहीर केले. ते आपल्या मुलीला मुक्ताईनगर मधून तिकीट मिळावे म्हणून प्रयत्नशील आहेत.

एकनाथ खडसें पाठोपाठ विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे हे नेतेही तिकिटासाठी अजून वेटिंग वर आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *