Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अभिनेत्री दीपाली सय्यद ने बांधले शिवबंधन, जितेंद्र आव्हाडां विरोधात मुंब्र्यातून मिळू शकते उमेदवारी

अभिनेत्री दीपाली सय्यद ने बांधले शिवबंधन, जितेंद्र आव्हाडां विरोधात मुंब्र्यातून मिळू शकते उमेदवारी

मुंबई : अभिनेत्री दीपाली सैय्यद यांनी काल मातोश्री निवासस्थानी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते.

दीपाली सय्यद या मराठी सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्री असून त्यांनी मास्तर एके मास्तर, उचला रे उचला, जत्रा, लाडीगोडी, मुंबईचा डबेवाला, करायला गेलो एक या व अनेक चित्रपटांत काम केले आहे.

२०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत त्या आप च्या तिकिटावर अहमदनगर मधून उभ्या होत्या. गेली ५ वर्ष त्या सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असून कोल्हापूर-सांगली च्या पुरग्रस्तांनाही त्यांनी भरघोस मदत केली. शिवसेना त्यांना मुस्लिम बहुल असलेल्या मुंब्रा मतदारसंघतून राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तिकीट देऊ शकते अशी अटकळ आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *