“शिवसेनेने अवास्तव मागणी केली”; राजीनामा देण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेवर आगपाखड
मुंबई: आज सकाळी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की ३० नोव्हेंबर पर्यंत वाट न पाहता उद्या सकाळी बहुमत सिद्ध करावे. यानंतर पटापट घडामोडी घडू लागल्या दुपारी अडीच च्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची बातमी आली व त्यांनंतर साडेतीन वाजता देवेंद्र फडणवीस यांनीही आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी आपण का राजीनामा देत आहोत, गेल्या ५ वर्षांत काय कामगिरी केली याचा पाढा वाचला.
पण याच सोबत त्यांनी या साऱ्या आपला सारा राग शिवसेनेवर काढला.
नेमकं काय म्हणाले माजी मुख्यमंत्री फडणवीस
# जे लोक मातोश्रीवरुन बाहेर पडत नव्हते, ते अनेकांच्या पायऱ्या झिजवू लागले.
# आम्ही शिवसेना आमच्यासोबत येईल याची वाट पाहिली. मात्र नंबर गेम लक्षात आल्यावर शिवसेनेने नको त्या मागण्या केल्या. आम्ही त्यांना काहीही वचन दिलं नव्हतं. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ही अट ठरलीच नव्हती.
# जनतेने भाजपला जनादेश दिला, कारण आम्ही ७० टक्के जागा जिंकलो, तर शिवसेना केवळ ४० टक्के जागांवर विजयी झाली.
# शिवसेनेला लाचारी लखलाभ, भाजप जनतेचा आवाज बनून विरोधीपक्षाची भूमिका बजावेल.
# शिवसेनेने अवास्तव मागणी केली. ती पुरवणं शक्य नव्हतं, शिवसेनेने हट्ट न सोडल्याने व दुसऱ्या पक्षांसोबत गेल्याने आम्हाला नाईलाजाने अजित पवारांसोबत जावं लागलं.
