उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने वन योद्ध्यांचा सन्मान सोहळा संपन्न
उरण दि. २६(विठ्ठल ममताबादे): चिरनेर येथील अक्कादेवी कलम डोंगर परिसरांत लागलेला भीषण वणवा विझवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या २६ वन योद्ध्यांचा सन्मान वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे यांच्या वतीने साई देवस्थान साईनगर वहाळ येथे कामगार नेते महेंद्र घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
दरवर्षी उरण पूर्व विभागात असलेल्या वनसंपदेने नटलेल्या डोंगर परिसरांत या ना कारणाने वणवे लागत असतात. हे वणवे आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सामाजिक संस्थांच्या माध्यमातून केला जातो.
अशाच प्रकारचा वणवा नुकताच १३ मार्च रोजी चिरनेर येथील अक्कादेवी कलम परिसरात लागला होता. हा लागलेला वनवा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न वनविभाग कर्मचारी, निसर्ग वन्यजिव संरक्षण संस्था व महाराष्ट्र हरित सेनेच्या पदाधिकारी व सदस्य यांनी केला होता. त्या बद्दल त्या कर्मचारी व पदाधिकारी यांना वन मॅन योद्धा सन्मानपत्र देवून मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
या वेळी कामगार नेते इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत, साई देवस्थानचे संस्थापक रवि पाटील, महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे चे संस्थापक मनोज पाटील, पनवेल वनविभागाचे संजय पाटील, माजी सैनिक निलेश म्हात्रे, रोटरी क्लब उलवे नोडचे अध्यक्ष शिरीष कडू, जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनिल ठाकूर , विवेक केणी, रायगड समालोचक असोशिएशन दिनेश पाटील, वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी, प्रशांत पवार, उपाध्यक्ष नंदेश ठाकूर, सचिव सागर मढवी, हेमल मढवी आदि मान्यवर उपस्थित होते .
वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने वन मॅन योद्धा-२०२१ हे सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आले त्यांची नावे खालीलप्रमाणे
मा. श्री. केरू देवराम राऊतराये (वनपाल उरण)
मा. श्री. सनी वसंत ढोले (वनरक्षक चिरनेर)
मा. श्री. संतोष बाबाजी इंगोले (वनरक्षक कळंबुसरे)
पक्षीमित्र – सर्पमित्र श्री. आनंद हिराजी मढवी (रा. चिर्ले )
श्री. विवेक गजानन केणी (रा. चिरनेर)
श्री. बबन जोमा ठाकूर (रा. चिरनेर)
श्री. महेश चावजी भोईर (रा. कळंबुसरे)
श्री. काशिनाथ दामोदर खारपाटील (रा. चिरनेर)
श्री. पंकज दिपक घरत (रा. चिर्ले)
श्री. सुनिल नाईक (रा. टाकीगांव)
श्री. अभिमन्यू पाटिल (रा. दिघाटी)
श्री. दिलीप हिराजी मढवी. (रा. चिर्ले)
श्री. सुमित शिवदास मढवी (रा. चिर्ले)
श्री. प्रद्युम्न बाळकृष्ण शेळके (रा. चिर्ले)
कुमार. विनित जितेंद्र मढवी (रा. चिर्ले)
श्री. अंकूश कातकरी (रा. चिरनेर)
श्री. कैलास किसन मढवी (रा. चिर्ले)
श्री. मयूर दिलीप मढवी (रा. चिर्ले)
श्री. शिवप्रसाद भेंडे (रा. कळंबुसरे)
कु. शुभम सिताराम मढवी (रा. चिर्ले)
श्री. नितीन शाम मढवी (रा. चिर्ले)
श्री. राजेश रामचंद्र ठाकूर (रा. जिते)
श्री. प्रतीक सुनील कोळी (रा. गव्हाण)
श्री. रुपेश अर्जुन भोईर (रा. न्हावा)
श्री. संतोष रामनाथ पाटील (रा. कळंबूसरे)
श्री. मनोहर काशिनाथ फुंडेकर (रा. चिरनेर)
