Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बालदिनी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ “भविष्यात दारू, सिगारेट, गुटखा असे मादक पदार्थांचे सेवन करणार नाही”

बालदिनी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ “भविष्यात दारू, सिगारेट, गुटखा असे मादक पदार्थांचे सेवन करणार नाही”

कल्याण — भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती *सम्राट अशोक विद्यालयात* साजरी करण्यात आली. लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तरच ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतात. या विचाराने पंडित नेहरूंनी मुलांसाठी अनेक योजना आखल्या. आपल्या गुणी स्वभावामुळे मुलांनाही ते आपलेसे वाटायचे त्यांना आदरांजली म्हणून १४ नोव्हेंबर जन्मदिनी बालदिन साजरा केला जातो. सम्राट अशोक विद्यालयात बालदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी आपल्यातील असलेली दुष्प्रवृत्ती व भविष्यात व्यसनाधीन होऊ नये म्हणून व्यसनाचे दुष्परिणाम सांगून दारू सिगारेट गुटखा अशा मादक पदार्थाचे हवन करण्यात आले . भविष्यात अशा मादक पदार्थाचे सेवन करणार नाही आणि दुसऱ्याला ही करू देनार नाही अशी शपथ विद्यार्थ्यांनी यावेळी घेतली. कार्यक्रम प्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडेंसह शिक्षक उपस्थित होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *