भाजपने एवढं ताणून घ्यायची गरज नव्हती, जे ठरलंय त्या सूत्राची अंमलबजावणी करणं गरजेचं होतं : आ. बच्चू कडू
मुंबई: प्रहार जनाशक्तीचे आमदार बच्चू कडू यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राजकुमार पटेल हेही उपस्थित होते. मातोश्री बाहेर आल्यावर एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना ते म्हणाले की, “शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळाली नाही तर आम्ही राज्यपालांच्या घरासमोर आंदोलन करणार.”
या नंतर युतीबाबत भाष्य करताना ते म्हणाले की आधी शेतकऱ्यांना मदत करा, सत्ता स्थापना होईल तेव्हा होईल. तसेच पुढे ते म्हणाले की शिवसेनेचा मुख्यमंत्री झालेला आवडेल. यावेळी ते भाजपला शालजोडीतले लगावताना म्हणाले की, “भाजपने एवढं ताणून घ्यायची गरज नव्हती, जे ठरलंय त्याप्रमाणे ५०-५० टक्के सूत्राची अंमलबजावणी करणं गरजेचं होतं.” एकूणच शिवसेना-भाजपच्या सत्ता संघर्षात बच्चू कडू यांनी उडी घेत भाजपला थेट शिंगावर घेतल्याचे म्हटले जातेय.
