महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त राज्यपालांकडून अभिवादन
मुंबई, दि. १९ : महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. समाजसुधारणेच्या कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या महात्मा बसवेश्वर यांच्या विचारांना यावेळी उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्यासह लोकभवनातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती यावेळी होती. महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध ठिकाणी त्यांच्या विचारांचे स्मरण करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.
