Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Breaking News: अजित पवार यांचे सदस्यत्व रद्द केल्याचा शरद पवारांनी आपल्या भाषणात केला उल्लेख

अजित पवार यांचे सदस्यत्व रद्द केल्याचा शरद पवारांनी आपल्या भाषणात केला उल्लेख

मुंबई: आज सायंकाळी झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या संयुक्त बैठकीत उपस्थित १६२ आमदारांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित सर्वपक्षीय आमदारांना एकसंध राहण्याचा सल्ला दिला. यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अश्वस्थ केले की गटनेते म्हणून जरी अजित पवारांनी सह्या असलेले पत्र राज्यपालांना दिले तरी आता त्यांना पक्षप्रमुख म्हणून मी या पदावरून दूर केले आहे. त्यामुळे कोणताच आमदार निलंबित होण्याचा संबंध उद्भवत नाही. तसेच यावेळी त्यांनी अजित पवार यांच पक्षाच सदस्यत्व रद्द केल्याचेही जाहीर केले. यामुळे गेले २ दिवस चाललेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *