अजित पवार म्हणाले “मी नाराज नाही”
मुंबई: आज सकाळपासून पुनः एकदा अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. पण थोड्यावेळापूर्वी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की मी नाराज नाही. माझी बहिण सुप्रिया सोबत मी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार आहे.
यावेळी ते म्हणाले की, “मी आज मंत्रीपदाची शपथ घेणार नाही. शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांच्यासह एकूण सहा आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.” तसेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष आणि त्यांनी स्थापन केलेली महाविकास आघाडी यांचं सरकार पाच वर्षे टिकणार यात माझ्या मनात मुळीच शंका नाही. तुम्ही म्हणत असाल तर स्टँपपेपरवरही लिहून देतो.”
आज जरी अजित पवार शपथ घेणार नसतील तरी त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाण्याची जास्त शक्यता आहे.