सुप्रिया सुळे म्हणाल्या “माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब…! आज तुमची खुप आठवण येतेय”
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी पूर्वी त्यांच्या मातोश्री दिवंगत मीनाताई ठाकरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण काढली. यावेळी ट्विट करत त्या म्हणाल्या की, “माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब…! आज तुमची खुप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात.तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता,आहात आणि राहाल.”
माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब…! आज तुमची खुप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात.तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता,आहात आणि राहाल.
— Supriya Sule (@supriya_sule) November 28, 2019